वसई-विरारमध्ये निवडणुकीचे वारे

वसई-विरारमध्ये निवडणुकीचे वारे

Published on

वसई, ता. २ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात लवकरच वसई-विरार महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लवकरच होणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्ष, अपक्ष उतरणार आहेत. महापालिकेवर एकहाती सत्ता असलेली बहुजन विकास आघाडीही मैदानात उतरली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व संघटनावाढीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय ताकद आजमावली जाणार आहे.

वसई-विरार महापालिका स्थापनेनंतर निवडणुकीत बविआने पालिकेत बलाबल निर्माण केले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. कोरोना काळात नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे थेट पालिकादरबारी नागरिकांना ये-जा करावे लागले, तसेच लोकप्रतिनिधी समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन जाऊ लागले आहे. स्थायी समिती व महासभेत घेण्यात येणाऱ्या निर्णयाला रोख लागला. त्यामुळे नागरिकांची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागला. महापालिका निवडणूक लवकरच होणार असल्याने पक्षीय ताकद व प्रभागांमधील स्थानिक चेहरा आजमावण्यासाठी स्पर्धा सुरू होऊ लागली आहे, अशातच बविआचे सर्वेसर्वा, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर हे मैदानात उतरले आहेत. त्याचसोबत माजी महापौर प्रवीणा ठाकूर यादेखील अनेक कार्यक्रमांत हजेरी लावून कार्यकर्ते व नागरिकांना आतापर्यंत नागरिकांच्या हितासाठी, विकासासाठी काम करीत असल्याचे मत मांडू लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होऊ लागली आहे.

विरार पूर्व आणि पश्चिम येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला व निवडणुकीची तयारी सुरू करा, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी महापालिकेवर झेंडा रोवणार की, अन्य पक्ष बाजी मारणार हे निवडणुकीनंतर समोर येणार आहे; परंतु सध्या तरी राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष
प्रत्येक निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांची भूमिका गुलदस्त्यात असते. शेवटच्या क्षणी पत्ता उघडला जातो. आगामी निवडणुकीत बविआ स्वबळावर की महाविकास आघाडी किंवा अन्य कोणत्या पक्षाशी युती करणार, हेदेखील राज गुपित आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महायुती टिकणार का?
शिवसेनेचा शिंदे गट व भाजप स्वतंत्र लढले तर निवडणुकीत किती जागा लढवणार, एकत्र आले तर किती जागा महायुती घटक पक्षाला मिळतील, यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com