यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ वर्षीय विधीच्या प्रवेशा‍त किंचित घट

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ वर्षीय विधीच्या प्रवेशा‍त किंचित घट

Published on

पाचवर्षीय ‘विधी’साठी ७५.५० टक्के प्रवेश
मागील वर्षीच्या तुलनेत घट; यंदा मुलींची संख्या सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद लाभला. राज्यात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ७५.५० टक्के प्रवेश झाले, असून मागील वर्षांच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले.
विधी शाखेच्या प्रवेश प्रक्रिया ३० जून ते ११ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात आली. संस्थात्मक फेरीसह नियमित तीन फेऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील १६१ विधी महाविद्यालयात हे प्रवेश झाले. पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांसाठी एकूण १३ हजार ५९७ पैकी १० हजार २६७ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यात ५३ टक्के मुली, तर ४६ टक्के मुलांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहिली असता पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ८१.७० टक्के प्रवेश झाले. कॅपच्या ११ हजार ३५६ जागांपैकी नऊ हजार २७८ जागांवर प्रवेश झाले आहेत.
----
ईडब्ल्यूएसच्या ६६.९१ टक्के जागा रिक्त
ईडब्ल्यूएसच्या ९६७ पैकी केवळ ३२० जागा भरल्या असून, ६४७ जागा रिक्त होत्या. म्हणजे यंदा ईडब्ल्यूएसच्या केवळ ३३.०९ टक्के जागांवर प्रवेश झाले असून, ६६.९१ टक्के जागा रिक्त आहेत. व्यवस्थापनच्या एक हजार २७४ जागांपैकी ६६९ जागेवर प्रवेश झाले असून ६०५ जागा रिक्त आहेत.
--
मुला-मुलींची प्रवेशातील संख्या (टक्क्यांमध्ये)
वर्ष मुली मुले
२०२३-२४ ५१.३७ ४८.६३
२०२४-२५ ५१.८५ ४८.१५
२०२५-२६ ५३.१० ४६.९
---
विधीचे मागील वर्षातील प्रवेश
शैक्षणिक वर्ष महाविद्यालयांची संख्या एकूण जागा प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थ्यांची टक्केवारी रिक्त जागा रिक्त जागांची टक्केवारी
२०२३-२४ १४२ १२,४२३ ८,०६२ ६४.९० टक्के ४,३६१ ३५.१० टक्के
२०२४-२५ १३७ १२,७३१ ९,४३८ ७४.१३ टक्के ३,२९३ २५.८७ टक्के
२०२५-२६ १६१ १३,५९७ १०,२६७ ७५.५० टक्के ३,३३० २४.५० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com