सरसकट भरपाईची भात उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

सरसकट भरपाईची भात उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Published on

विक्रमगड (बातमीदार) : गेल्या आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने विक्रमगड तालुक्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फक्त पंचनाम्यांची मलमपट्टी नको. येथील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत व नुकसानभरपाई द्या तसेच कर्जमाफी द्या. पीक विम्याचे पैसे तत्काळ जमा करा. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), भाजप, काँग्रेसतर्फे विक्रमगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गेल्या दोन वर्षांत भात उत्पादक शेतकऱ्यांचे पाऊस तसेच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या वर्षीही शेतकऱ्यांचे मोठी हानी झाली आहे. सरसकट शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तरच येथील शेतकरी या संकटातून बाहेर पडेल, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम आळशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com