वाशीतील पाणी तुंबण्याच्या समस्या मिटणार

वाशीतील पाणी तुंबण्याच्या समस्या मिटणार

Published on

वाशीतील पाणी तुंबण्याची समस्या मिटणार
धरण तलावांच्या पंप दुरुस्तीला अखेर हिरवा कंदील
नवी मुंबई, ता. १ : वाशी सेक्टर ८ परिसरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून नागरिक त्रस्त होत होते. खाडीकडील बाजूस असलेल्या धरण तलावा (होल्डिंग पाँड)च्या पंप हाउसची गेली अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. अखेर या पंप हाउसच्या दुरुस्तीसह नव्या पंपिंग स्टेशनच्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे वाशीतील पाणी तुंबण्याच्या दीर्घकाळच्या समस्येला आता कायमचा आळा बसण्याची शक्यता आहे.
२०१५ ते २०२० या काळात माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी हा मुद्दा सातत्याने स्थायी समिती आणि महापालिका सभेत उपस्थित केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वाशी सेक्टर ८-ए येथे नव्या वादळ पाणी पंपिंग स्टेशनच्या उभारणीचा प्रस्ताव २०१९मध्ये सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १३ अंतर्गत मंजूर करण्यात आला. या निर्णयानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली; परंतु कोविडच्या महामारीमुळे कामात मोठा अडथळा आला आणि आदेश देण्यास उशीर झाला. अखेर २० मे २०२१ रोजी कामाचा आदेश देण्यात आला. प्रकल्पाची मूळ पूर्णत्व तारीख २३ नोव्हेंबर २०२२ होती; मात्र महामारीमुळे ती वाढवून ३१ मे २०२५ करण्यात आली. त्यानंतर एमसीझेडएमएसह विविध पर्यावरणीय परवानग्यांची आवश्यकता भासली. सर्व परवानग्या पूर्ण केल्यानंतर प्रकरण मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आले. जवळपास १५ सुनावण्यांनंतर ६ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयाने या प्रकल्पाला परवानगी दिली.
..............
पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास उशीर झाला आणि दुसरी मुदतवाढ ३१ मार्च २०२७ पर्यंत देण्यात आली. आयआयटी मुंबईने १ सप्टेंबर २०२५ रोजी हायड्रॉलिक डिझाईन मंजूर केले तसेच ३ ऑक्टोबर २०२५ रोजी तांत्रिक प्रस्ताव मंजूर केला आहे. त्‍यामुळे पावसाळा संपल्यानंतर आता प्रत्यक्ष काम सुरू झाले असून, पंपिंग स्टेशनचे बांधकाम गतीने सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत दिव्या गायकवाड यांनी सतत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामात थेट लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाशी शहरात पावसाचे पाणी तुंबता कामा नये, यावर ते ठाम होते. गायकवाड यांनी महापालिका आयुक्त डा. कैलाश शिंदे, अभियंता विभाग, कायदेशीर टीम आणि न्यायालयीन परवानगी मिळवून देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दिव्या गायकवाड म्हणाल्या, की आता वाशीकरांना दिलासा मिळेल. तसेच नवी मुंबईतील सर्व धरण तलावांची गाळकाढणी व स्वच्छता प्रकरणेही गतीने पुढे जावी, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com