महायुती माथाडी कामगारांच्या पाठिशी

महायुती माथाडी कामगारांच्या पाठिशी

Published on

महायुती माथाडी कामगारांच्या पाठीशी
एपीएमसीतील संवाद मेळाव्यात योगेश कदम यांचे आश्वासन
वाशी, ता. १ (बातमीदार) : माथाडी कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याबाबत महायुती सरकार कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदैव माथाडींच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील असून, त्यांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुर्भे येथील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेतर्फे माथाडी कामगार मेळावा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईतील रहिवाशांसोबत ‘संवाद मेळावा’ पार पडला. या वेळी खासदार नरेश मस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले, संपर्कप्रमुख अंकुश कदम, बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेना आणि माथाडी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातील गोदामांमध्ये कार्यरत माथाडी कामगारांचे हक्क अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले जातील, असेही कदम यांनी सांगितले.
--------------------------
घरांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे कोपरखैरणे आणि घणसोली येथील घरांसंबंधी प्रश्न, मास हाउसिंग योजनेतील घरे स्वस्त करण्याचा मुद्दा व इतर स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली. मी स्वतः माथाडी भवनमध्ये येऊन चर्चा करणार, असेही शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
---------------------------
नवी मुंबईत महायुती लढणार
राज्यात लोकसभा आणि विधानसभेत महायुतीने एकत्र लढल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही महायुतीच्याच नावाने लढवली जाईल, असे खासदार नरेश मस्के यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिंदे गट पदाधिकाऱ्यांमध्ये महायुतीबाबत मतभेद असल्याची चर्चा असताना मस्के यांच्या या वक्तव्यामुळे तात्पुरता विराम मिळाला असला तरी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com