सजग दृष्टीकोनातून पाहिलंत, तर बदललेला रोहा दिसेल

सजग दृष्टीकोनातून पाहिलंत, तर बदललेला रोहा दिसेल

Published on

सजग दृष्टिकोनातून पाहिलंत, तर बदललेला रोहा दिसेल
खासदार सुनील तटकरे यांचा शिवसेनेवर पलटवार
रोहा, ता. १ (वार्ताहर) ः ‘रोहा बदलतोय’ या घोषवाक्याने शिवसेना (शिंदे गट)ने रोहा शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर्स झळकावून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. याच मोहिमेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सजग आणि उपरोधिक भाषेत पलटवार करत डोळे असले म्हणजे दिसतेच असे नाही, दृष्टी असावी लागते. सजग दृष्टिकोनातून पाहिलेत, तर बदललेला रोहा प्रत्येकाला दिसेल, असा टोला शिवसेनेला लगावला.
रोहा मोहल्ल्यात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी शिवसेनेच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले, की रोहेकर जनता सुज्ञ आणि विचारतज्ज्ञ‍ आहे. गेल्या २५ वर्षांत रोहा शहराचा कायापालट झाला आहे. या विकासप्रक्रियेत जनतेचा थेट सहभाग आहे. प्रखर राजकीय इच्छाशक्तीमुळे आम्हाला रोहेकरांनी सेवा करण्याची संधी दिली आणि ही विकासाची गंगा अशीच वाहत राहील. या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष समीर सकपाळ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, शहराध्यक्ष अमित उकडे, महिला तालुकाध्यक्षा प्रीतम पाटील, शहराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, तसेच मयूर दिवेकर, राजू जैन आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक रमेश साळवी, हेमंत साळवी, संदेश सावंत, दीपिका कोरपे, दीपक कोरपे, शैलेश कदम, सोन्या चव्हाण, गणेश जगताप, जयंत पांचाळ, शैलेश बोथरे, योगेश सावंत, चेतन पवार, अक्षय कोळंबेकर यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
...............
मनोगत व्यक्त करताना समीर सकपाळ म्हणाले, मी काँग्रेस पक्षावर नाराज नाही. नऊ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या काळात मी निवडून आलो आणि शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी हातात हात घालून काम केले. पूर्वी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी निधी नसे; पण आज तटकरे दर महिन्याला कोट्यवधी निधी रोह्यासाठी आणतात. या विकासामुळे प्रभावित होऊन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करतो आहोत. मी गेली नऊ वर्षे तुमच्यासोबत काम केले आहे. तुम्ही मला आजवर जसे सांभाळले, तसेच पुढेही सांभाळा. आता जबाबदारी तुमचीच आहे, अशा भावनिक शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी नेतृत्वाविषयी विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com