वेळ आली तर लोकशाही वाचवायला दंडुका हाथी घेऊ : आमदार रोहित पवार
...तर लोकशाहीसाठी दंडुका हाथी घेऊ
आमदार रोहित पवार यांचा इशारा
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : जो लोकशाहीच्या विरोधात असेल, पोलिस व प्रशासकीय यंत्रणा ॲक्ट करीत नसतील तर त्या लेव्हलला आल्यावर आम्हीसुद्धा दंडुका घेऊ, असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षांना दिला.
मुंबईत महाविकास आघाडीच्या ‘सत्याचा मोर्चा’त सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार वाहतूक कोंडी असल्याने कल्याणला पोहोचले. चाळीसगावचे माजी आमदार राजेश देशमुख यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या नातेवाइकांच्या सांत्वनासाठी रोहित पवार एक्स्प्रेसने चाळीसगावला जाण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी आपला ताफा कल्याणला बोलावून घेत कल्याणच्या कार्यकर्त्यांसोबत जेवण करून कल्याणातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कल्याण शहर शाखेला भेट दिली.
या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की २९१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०२४च्या निवडणुकीपर्यंत दर महिन्याला मतदार नोंदणी झाली ती एकाच पॅटर्नमध्ये झाली असून, त्यामध्ये काही चुकीचं घडलं असल्याचे जाणवत नाही. त्यानंतर २०२५च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत ५२ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. हा जो मतदार नोंदणीचा पॅटर्न आहे तो विचित्र व अनपेक्षित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी कशी झाली, त्याच्यावर आमचा आक्षेप असून त्याचा आम्ही अभ्यास केल्यावर आता असे जाणवत आहे, की मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाली. आधार कार्डचा उपयोग करून दुसऱ्या लोकांनी बाहेरून येऊन मतदान केले आहे. या सर्व गोष्टी गंभीर असून लोकशाहीच्या विरोधात असल्याने लोकशाही टिकावी, संविधान टिकावे, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.
उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे नाव वगळण्याचा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल त्यांनी सांगितले, की तिसरा कुठला तरी व्यक्ती ऑनलाइनद्वारे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे नाव वगळण्यासाठी रजिस्टर करतो. उद्धव ठाकरे यांचे नाव होते म्हणून निवडणूक आयोगाचे लोक आले. सर्वसामान्य लोकांची काय अवस्था असेल? बाकीच्यांकडे ही लोकं येतच नाहीत. ऑनलाइन नाव आलं की रजिस्टर टाकत असतील. काहींना आपले नाव रजिस्टर झाले असल्याचे कळतदेखील नसल्याने त्याच्या जागेवर दुसरा कोणीतरी खोटे आधार कार्ड घेऊन मतदान करतात, असा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन
राज ठाकरे यांनी आजच्या मोर्चात दुबार मतदारांवर लक्ष ठेवा व असे कोणी करीत असतील तर त्यांना फोडून काढा, अशी भूमिका घेतल्याने या भूमिकेला रोहित पवार यांनी समर्थन देत कधी कधी लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचे असेल, तर दंडुके हाती घेण्याची वेळ आली आहे. लोकशाही टिकली नाही तर गरिबांचे नुकसान होईल. गरिबांच्या बाजूने विचार करीत असताना हे जे चोर लोक आहेत ते पैसे खाऊन मतदान करणारे आहेत. ते लोकशाहीच्या विरोधात आहेत. त्यांना थोडासा दंडुका दाखवायला काहीच हरकत नाही. वेळ आली तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही दंडुका हाथी घेऊ, असे रोहित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

