साहित्य फराळ

साहित्य फराळ

Published on

साहित्य फराळ

दर्यावर्दी
‘दर्यावर्दी’ दिवाळी अंक यंदा ८३व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने सागरावरील विशेष लेखांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. सागराच्या पोटात अमाप संपत्ती दडली आहे. मच्छीमार बांधवांना विविध जातींचे मासे समुद्रापासूनच मिळतात. हे सागराचे सामर्थ्य आणि समुद्रात सुरू असलेेले संशोधन, मासेमारीत झालेले आधुनिक बदल, प्रदूषण अशा अनेक विषयांचा धांडोळा संपादक अमोल सरतांडेल यांनी ‘दर्यावर्दी’मधून घेतला आहे. सागराला मानवी विकासामुळे अनेक समस्यांना कसे सामोरे जावे लागते, यावर लेखिका डॉ. नंदिनी देशमुख यांनी प्रकाशझोत टाकला आहे. ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी, निमखाऱ्या पाण्यात कोळंबी संवर्धन, सागर, प्लवक आणि पक्षी, समुद्रातील जैवसामग्री, कोकणचा राजा : हापूस आंबा, शाश्‍वत कोकण विकासाचे शिवधनुष्य, भारतातील सरोवर संवर्धन, महाराष्ट्राच्या समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषण या विषयांचा प्रा. डॉ. दिलीप काकवीपुरे, प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी, डॉ. अभय हुले, डॉ. गौतमी ठाकूर, प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, पांडुरंग भाबल, डॉ. प्रमोद साळसकर, डॉ. बाळासाहेब कुलकर्णी यांनी विस्तृत आढावा घेतला आहे. होडी चालवणारे रघुनाथ दामोदर ऊर्फ अण्णा ठोके यांचा ‘होडीवान अण्णा’ या लेखातून प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी यांनी मांडलेला प्रवास प्रेरणादायी आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पक्षीनिरीक्षण, गाबीत समाज आणि त्यांचे आरमार-जहाजे या विषयांवरील प्रा. डॉ. मंगेश जांबळे, नारायण आडकर यांचे लेख वाचनीय आहेत. अंकातील कथा, कविता उल्‍लेखनीय आहेत.

संपादक ः अमोर सरतांडेल, पाने ः १४८, किंमत ः १५० रुपये
...

संतुलित मन
मन शांत, संतुलित आणि स्थिर असेल, तर जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची ताकद आपोआप निर्माण होते; मात्र आजच्या वाढत्या स्पर्धेच्या, ताणतणावाच्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगात हे संतुलन राखणे सोपे नाही. या अस्थिर मनाला नव्याने उभारी देण्यासाठी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीने ‘संतुलित मन’ हा दिवाळी विशेषांक सादर केला आहे. या विशेषांकात विविध क्षेत्रांतील नामवंत लेखक आणि तज्ज्ञांनी मनाच्या संतुलनाचे विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अनुभव यांचे बहुआयामी विश्लेषण केले आहे. लेखक अच्युत गोडबोले तसेच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वराली कुलकर्णी यांनी ‘मानसशास्त्राची दुनिया उत्क्रांतीच्या टप्प्यावर’ या विषयावर चिंतन केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानसिक आरोग्यसेवांना कसे नव्या आणि अधिक प्रभावी टप्प्यात घेऊन जाऊ शकते, यावर त्यांनी विचारमंथन केले आहे. स्त्रियांच्या मनोविश्वावर प्रकाश टाकत प्रा. डॉ. मेधा कुमठेकर यांनी ‘स्त्रियांचे मनःस्वास्थ्य स्त्रियांच्याच हाती’ या लेखातून स्वयंसूचनेच्या तंत्राने भीतीवर मात करून आत्मविश्वास कसा वाढवावा, हे सखोल सांगितले आहे. डॉ. गौतम गवळी यांनी तरुणांच्या मानसिक संतुलनाच्या समस्यांवर आणि तंत्रज्ञानाच्या युगात नव्या मानसिक धोरणाची गरज यावर लेखन केले आहे. विशेष मुलांचे पालकत्व ही जरी संवेदनशील जबाबदारी असली तरी ती अभिमानाने निभावण्याची प्रेरणा सचिन सारोळकर यांच्या लेखातून मिळते. ‘विशेष मुलांचे पालकत्व निभवताना’ या लेखात त्यांनी विशेष मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. हा दिवाळी विशेषांक म्हणजे केवळ वाचनाचा नाही, तर आत्मचिंतनाचा प्रवास आहे.

संपादक : निखिल पंडितराव, पाने : १८८, किंमत : २०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com