कल्याणच्या ''रवींद्र कला विद्यालयाला'' ११ पदके

कल्याणच्या ''रवींद्र कला विद्यालयाला'' ११ पदके

Published on

कल्याणच्या ‘रवींद्र कला विद्यालयाला’ ११ पदके
थायलंड येथील कथक नृत्य स्पर्धेत चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कल्याणमधील रवींद्र कला विद्यालयाच्या नृत्यांगनांनी सुवर्णपदकासह एकूण ११ पदकांची लयलूट केली आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल कॉन्सिल ऑफ आर्ट्स ॲण्ड कल्चर’तर्फे ही १५ वी इंटरनॅशनल कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात विविध देशांतील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.

थायलंडमधील पटाया येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी कल्याणच्या रवींद्र कला विद्यालयाची निवड झाली होती. विद्यालयाच्या संचालिका गुरू स्मिता परांडेकर यांनी विद्यार्थिनींना नियमित तालीम देऊन मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेत इतर देशांमधील नृत्य प्रकारांबरोबरच कथक नृत्य शैलीचे प्रकार लक्षवेधी ठरले आणि त्यांना उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

नायशा भारद्वाज हिने निमशास्त्रीय नृत्य (हितांशी सोमपुरा) प्रकारात सुवर्णपदक जिंकले. एंजल श्रीधर हिने कथक शास्त्रीय नृत्य (एकल प्रकार) मध्ये रौप्यपदक मिळवले. स्मृती वायकोळे हिला एकल नृत्य प्रकारात रौप्यपदक मिळाले. पद्मजा प्रभू हिला कथक शास्त्रीय नृत्य (तिहेरी प्रकार) मध्ये रौप्यपदक मिळाले. माधुरी कांबळे हिला कथक शास्त्रीय नृत्य (तिहेरी प्रकार)मध्ये रौप्यपदक मिळाले. दिक्षा कांबळे हिला कथक शास्त्रीय नृत्य (तिहेरी प्रकार)मध्ये रौप्यपदक मिळाले. प्रियंका देशपांडे हिला निमशास्त्रीय एकल प्रकारात कांस्यपदक मिळाले. किरण आपटे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले, तर सलोनी मंत्री हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

विद्यार्थिनींचा जल्लोष
आपल्या विद्यार्थिनींच्या यशस्वीतेसाठी प्रभावी प्रयत्न करणाऱ्या रवींद्र कला विद्यालयाच्या संचालिका स्मिता परांडेकर यांनाही या सोहळ्यात विशेष सन्मान मिळाला. त्यांना पायोनियर गोल्ड मेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी ११ पदकांचा मान मिळाल्याने विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला. शालेय अभ्यासक्रमासोबतच समर्पित भावाने नृत्याचे धडे गिरवणाऱ्या आणि कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थिनींमुळे हे यश मिळाल्याचे संचालिका परांडेकर यांनी सांगितले. यापूर्वीही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये देदीप्यमान यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com