जनताहित फाउंडेशन''तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
जनताहित फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
टिटवाळा, ता. २ (वार्ताहर): जनताहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या संकल्पनेतून मधुबन सोसायटी व पिंपळेश्वर चाळीच्या परिसरात असलेल्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पृथ्वीला ऑक्सिजनने भरूया, चला वृक्षारोपण करूया या घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या हस्ते झाले. माजी आमदार नरेंद्र पवार आणि माजी उपमहापौर, नगरसेवक बुधाराम सरनोबत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जनताहित फाउंडेशनतर्फे लोकांमध्ये निसर्गाप्रती जनजागृती व्हावी आणि पर्यायाने पक्षी संवर्धनासाठी जनतेने सहभाग द्यावा, या हेतूने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जनताहित फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘ड्रीम बर्ड्स हॉस्पिटल’ प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली. पक्षी संवर्धनाच्या या अभियानासाठी स्वाक्षरी मोहीमदेखील राबविण्यात आली, ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
उपस्थित सर्व मान्यवरांनी जनताहित फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. माजी आमदार पवार आणि माजी उपमहापौर सरनोबत यांनी या उपक्रमासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. संस्थेचे संस्थापक रितेश कांबळे यांसह संस्थेचे सचिव नेयाज शेख आणि कोषाध्यक्ष प्रमिला भडवलकर यांनी म्हटले की, प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलावा. वृक्ष आणि पक्षी हे आपल्या निसर्गातील महत्त्वाचे घटक असून, त्यांचे संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच जनताहितच्या ड्रीम बर्ड्स हॉस्पिटलसाठी जनजागृती होऊन नागरिकांनी त्यासाठी आपले छोटेसे का होईना योगदान दिले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

