थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

भैरव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
मुरूड (बातमीदार) ः मुरूड येथे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री भैरव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पहाटेपासून पूजा-अभिषेकास सुरुवात झाली असून गणेश पोतदार यांना यंदा पूजेचा मान मिळाला. पंचक्रोशीत एकमेव मंदिर असल्याने टाळ-मृदंगाच्या तालावर भजन-कीर्तन सुरू होते. मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमला होता. अध्यक्ष डॉ. विश्वास चव्हाण व उपाध्यक्ष सुयोग यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले. जुनीपेठ व कुंभारवाडा येथील नागरिकांनी एकत्र येऊन उत्साहात एकादशी साजरी केली.

साजगाव यात्रेत पावसाचे सावट; भाविकांचा उत्साह कायम
खालापूर (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील साजगाव ताकई मंदिरात कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी झाली. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले तरी दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील व पत्नी कविता यांनी पूजेचा मान स्वीकारला. रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून पायी दिंड्या आल्या; मात्र पावसामुळे दुकाने कमी प्रमाणात उघडली असून यात्रेच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली.
..................
क्षितिज असोसिएशनकडून महिलांना शिलाई मशीन वाटप
पेण (बातमीदार) ः तालुक्यात क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. संस्थापिका शीतल माळी यांनी ५० महिलांना ५० टक्के अनुदान दराने जुकी कंपनीच्या मशीन दिल्या. खालापूर तालुक्यातील चांभार्ली ग्रामपंचायतीतील खांबे येथे हा कार्यक्रम पार पडला. महिलांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या वेळी राधिका करंगुळे, यशिका करंगुळे आणि सदस्य उपस्थित होते.
.......
महाड रेल्वे जंक्शनसाठी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
माणगाव (बातमीदार) ः महाड शहराजवळ कोकण रेल्वे जंक्शन व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला. पराग वोडके हे उपोषण करत असून प्रशासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे, तालुकाध्यक्ष कैलास अटक, उपाध्यक्ष सुजित सुतार, सचिव निकेश पवार उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड रायगडतर्फे या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून जंक्शनसाठी लढा सुरूच राहणार आहे.
...........
शेतकऱ्यांना भरपाईसाठी वारकरी साहित्य परिषदेचे निवेदन
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव येथे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीसाठी वारकरी साहित्य परिषदेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महिला अध्यक्षा हभप योगिता मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर झाले. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली असून पंचनामे त्वरित करून शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी एकनाथ मानकर, रमेश दबडे आणि कीर्तनकार राजाराम गांगण महाराज उपस्थित होते.
...........
शिक्षण क्षेत्रात पोस्कोचा पुढाकार : १५व्या शाळेचे नूतनीकरण पूर्ण
माणगाव (वार्ताहर) ः सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत रा.जि.प. केंद्र शाळा, जिते यांचे नूतनीकरण पूर्ण केले आहे. या नव्या रूपातील शाळेचा उद्‌घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोस्को कंपनीने विद्यार्थ्यांना सुरक्षित, आधुनिक आणि आकर्षक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे काम केले. ही कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत नूतनीकरण झालेली १५वी शाळा ठरली आहे. नूतनीकरणाच्या कामांत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, संपूर्ण रंगकाम, नवीन इलेक्ट्रिकल फिटिंग, ग्रंथालय, रंगमंच, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. या सुधारित सुविधांमुळे ३७ विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून शिक्षकवर्ग आणि स्थानिक नागरिकांनाही या नव्या सोयींचा फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com