छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले ; खासदार सुनील तटकरे
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले ः खासदार सुनील तटकरे
मुरूड, ता. २ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे, म्हणजे लोककल्याणावर आधारित स्वराज्य निर्माण केले. अठरापगड जातींना एकत्र आणून अन्यायाविरुद्ध लढा देत त्यांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य फुलविले, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.
मुरूड नगर परिषदेच्या उद्यानात उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी, या भव्य पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रकल्पासाठी तब्बल दोन कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो पूर्ण झाल्यानंतर मुरूडच्या पर्यटन नकाशावर एक नवे आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, नेते मनोज भगत, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, सरपंच भाई सुर्वे, महिला तालुका अध्यक्षा ॲड. मृणाल खोत, ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद भायदे, आदेश दांडेकर आणि हसमुख जैन आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी खासदार तटकरे म्हणाले की, रायगडचा किल्ला ही स्वराज्याची पवित्र राजधानी असून, त्याचा वास्तुशिल्पीय आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता त्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत व्हावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी संसदेतही आवाज उठवला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय मुरूडचा किनारा ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळवण्यासाठी श्रीवर्धनप्रमाणेच सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. येणारा पर्यटन महोत्सव भव्य आणि अविस्मरणीय असेल, अशी हमीही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

