दिवाळीत एसटी महामंडळाची कोटींची कमाई

दिवाळीत एसटी महामंडळाची कोटींची कमाई

Published on

दिवाळीत एसटी महामंडळाची कोटींची कमाई
१० दिवसांत १३ लाख किमी धाव; तब्बल सात कोटींचे उत्पन्न
पेण, ता. २ (वार्ताहर) : दिवाळीच्या काळात प्रवाशांची सोय आणि सुविधा अबाधित राहावी, यासाठी रायगड विभागीय एसटी प्रशासनाने यंदा प्रभावी नियोजन केले होते. त्याचा परिणाम फक्त १० दिवसांत रायगडच्या लालपरीने तब्बल १३ लाख किलोमीटर धाव घेत सात कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून दाखविले. ही कामगिरी संपूर्ण राज्यातील एसटी विभागांमध्ये लक्षणीय ठरत आहे, तर यंदा प्रवाशांनीदेखील एसटीच्या सेवेला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले.
रायगड विभागातील महाड, माणगाव, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, मुरूड, कर्जत आणि रोहा या आठही आगारांमधून लालपरीची धावपळ दिवाळीत अविरत सुरू होती. वसुबारसपासून भाऊबीजपर्यंतच्या सलग दहा दिवसांत ४०७ बसगाड्यांनी १३ लाख ३५ हजार १४६ किलोमीटरचा प्रवास करत सहा कोटी ९४ लाख १९ हजार ९७० रुपयांचे उत्पन्न विभागाला प्राप्त झाले. हे आकडे दिवाळी काळातील एसटीच्या प्रचंड वापराचे व प्रवाशांच्या वाढत्या विश्वासाचे निदर्शक असल्याचे बोलले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाने सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी विशेष आराखडा तयार करून सर्व विभागांना पाठवला होता. त्यानुसार रायगड विभागाने जादा बसगाड्यांची तात्पुरती व्यवस्था, वेळापत्रकात बदल आणि गर्दीच्या ठिकाणी अधिक गाड्या चालवण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट, बसस्थानक, वसुली, तसेच प्रवासादरम्यान कोणतीही अडचण भासली नाही.
......................
राज्यातील गोरगरीब प्रवाशांसाठी लालपरी ही आपल्या हक्काची सोय आहे. सणासुदीच्या दिवसांत योग्य नियोजनामुळे प्रवाशांना सुविधा मिळाल्या आणि त्याचबरोबर एसटीचे उत्पन्नही वाढले. प्रवाशांच्या या विश्वासाबद्दल आम्ही ऋणी आहोत.
-डॉ. सुहास चौरे, रायगड विभाग नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com