वाशीत ‘महाराष्ट्र भवन’चे स्वप्न साकार

वाशीत ‘महाराष्ट्र भवन’चे स्वप्न साकार

Published on

वाशीत ‘महाराष्ट्र भवन’चे स्वप्न साकार
आमदार मंदा म्हात्रे यांचा पाहणी दौरा
नवी मुंबई, ता. २ : वाशीत ‘महाराष्ट्र भवन’ हे राज्यातील नागरिकांसाठी साकारत असलेले भव्य, बहुउद्देशीय केंद्र आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा वेग आणि गुणवत्तेवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
भवनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य बैठा पुतळा उभारण्यात येणार आहे, जो महाराष्ट्राच्या पराक्रम आणि अभिमानाचे प्रतीक ठरेल. या भवनातून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि प्रगती यांचा संगम अनुभवता येईल, असे म्हणत आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले, की महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे भवन एकूण १४ मजल्यांचे असणार असून, अभ्यागतांसाठी विश्रांतिगृहे, व्हीआयपी रूम, ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा आधुनिक सोयी असतील. लोकप्रतिनिधी, त्यांचे सहकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध राहणार आहेत. महाराष्ट्र भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ते राज्यभरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सन्मानाचे निवासस्थान ठरेल. आमदार म्हात्रे म्हणाल्या, २०१४ पासून महाराष्ट्र भवनासाठी केलेल्या लढ्याचे फळ अखेर मिळाले आहे. हे भवन नवी मुंबईपुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना परवडणारी आणि सुसज्ज व्यवस्था मिळणार आहे. या पाहणी दौऱ्यास भाजप महामंत्री नीलेश म्हात्रे, राजू शिंदे, कविता कटकधोंड यांसह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com