अंबरनाथमध्ये विषारी वायूचा कहर
अंबरनाथमध्ये विषारी वायूचा कहर
नागरिकांना श्वास घेणेही झाले मुश्कील
अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : भीमनगर आणि एम. पी. गेट परिसरात शुक्रवारी (ता. ३१) रात्री अचानक पसरलेल्या विषारी वायूने नागरिकांचा अक्षरशः श्वास गुदमरला. परिसरात काही क्षणांतच धुराचे प्रचंड प्रमाण वाढले, त्यामुळे वातावरण धुक्यासारखे दाट झाले. गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांकडून सतत धूर व रासायनिक वायू सोडण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्यावेळी वारंवार रासायनिक कंपनीतून धूर सोडला जात असून यामुळे वायू प्रदूषण वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तर शहरातील वायू प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी एमआयडीसीतील काही कंपण्याकडून हेतुपुरस्सर धूर सोडला जातो. त्यामुळे शेजारी असणाऱ्या वसाहती व गृहसंकलात राहणाऱ्या नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास होतो, तसेच डोळे चुरचुरणे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास असून दमा आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्याच्या या दिवसात या कंपन्या वातावरणातील आर्द्रतेचा फायदा घेत धूर आणि रासायनिक वायू सोडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
भीमनगरसह निसर्ग ग्रीन, बी-केबिन रोड परिसर, व इतर घनदाट वस्ती असलेल्या भागांमध्येही या धुराचा प्रभाव जाणवला. गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळी अंधाराचा फायदा घेऊन वायू सोडला जात असून शुक्रवारी सोडलेल्या या विषारी वायूमुळे जवळपास दीड तासांहून अधिक काळ हा वायू हवेत राहिला आणि त्यानंतरच काहीसा ओसरला असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक घरांमध्ये नागरिकांनी खिडक्या बंद करून बसलेले पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करताना दिसले. यावेळी धुके सदृश परिस्थितीमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडाला असून रस्ते ही दिसेनासे झाले होते.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे निखिल वाळेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार वारंवार घडतो आहे. आम्ही तातडीने आमच्या वरिष्ठ नेत्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. पुढील काही दिवसांत या संदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाईल.” असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

