‘त्रिशूल’द्वारे तिन्ही दलांचे शक्तिपरीक्षण

‘त्रिशूल’द्वारे तिन्ही दलांचे शक्तिपरीक्षण

Published on

‘त्रिशूल’द्वारे तिन्ही दलांचे शक्तिपरीक्षण

आजपासून नाैदलाचा सराव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः ‘त्रिशूल २०२५’ या त्रिसेना सरावात भारतीय नौदल, थलसेना आणि हवाई दल सहभागी हाेणार आहेत. देशातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव साेमवारपासून (ता. ३) सुरू हाेणार असून त्याचे नेतृत्व भारतीय नौदल करणार आहे. पश्चिम नौदल कमांडच्या समन्वयाने हा सराव पार पडणार आहे.

सरावादरम्यान राजस्थान आणि गुजरातमधील खाडी आणि वाळवंट क्षेत्रांपासून उत्तर अरबी समुद्रापर्यंत तिन्ही सेनांचे व्यापक प्रशिक्षण होणार आहे. भू, सागरी आणि हवाई अशा सर्व आघाड्यांवर एकत्रित मोहिमा राबवून सैन्यदलांतील समन्वय आणि सज्जता तपासली जाणार आहे. या सरावात आर्मी सदर्न कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि साउथ वेस्टर्न एअर कमांड या तिन्ही प्रमुख पथकांचा सहभाग असेल.
----
यंत्रणांमधील समन्वयाला बळकटी
भारतीय तटरक्षक दल, सीमासुरक्षा बल आणि विविध केंद्रीय यंत्रणाही सहभागी होणार आहेत. या सरावामुळे तिन्ही सेनांबरोबरच इतर सुरक्षा दलांतील समन्वय अधिक मजबूत केला जाणार आहे. या सरावाचा मुख्य उद्देश तिन्ही सेनांतील कार्यपद्धती आणि रणतंत्रांचा समन्वय साधून बहुआयामी वातावरणात संयुक्त मोहिमा राबवण्याची क्षमता वाढवणे हा आहे. तसेच सेनेच्या नेटवर्क, तळ आणि साधनसामग्री यांच्यातील इंटरऑपरेबिलिटी बळकट करण्यावर भर राहणार आहे.
-------------
प्रात्यक्षिकांमध्ये काय असेल?
- ‘त्रिशूल’ सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौका, भारतीय हवाई दलाची लढाऊ व सहाय्यक विमाने तसेच थलसेना आणि नौदलाच्या उभयचर तुकड्या सहभागी होतील.
- आयएनएस  जलश्वा आणि लँडिंग क्राफ्ट युटिलिटी (एलसीयू) जहाजांच्या साहाय्याने उभयचर मोहिमा पार पडणार आहेत.
- सरावादरम्यान संयुक्त गुप्तचर (आयएसआर), इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ईडब्ल्यू) आणि सायबर वॉरफेअर योजनांची पडताळणी करण्यात येणार आहे.
- नौदलाच्या विमानवाहू जहाजांवरून हवाई दलाच्या तळांशी समन्वय साधून संयुक्त मोहिमा राबविल्या जणार आहेत.
-------------
‘आत्मनिर्भर भारत’चा लष्करी आविष्कार
सरावात ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेखाली विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा वापर करण्यात येणार आहे. नव्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी आधुनिक रणतंत्र आणि तांत्रिक कौशल्यांचा प्रयोग या सरावाद्वारे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com