जव्हारमध्ये राजकीय हालचालींना वेग
जव्हारमध्ये राजकीय हालचालींना वेग
जव्हार, ता. ११ (बातमीदार): आगामी जव्हार नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, जव्हारच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय कॅप्टन विनीत मुकणे यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची सक्रियता आणि लोकसंपर्कामुळे या निवडणुकीतील समीकरणांवर त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कॅप्टन मुकणे हे शहरात विकास, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, २०० खाटांचे नवीन हॉस्पिटल आणि पर्यटन सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधला असून, यामुळे त्यांना चांगला जनाधार आणि विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.
माध्यमांशी बोलताना कॅप्टन मुकणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ‘‘जव्हारचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभार हा माझा एकमेव अजेंडा आहे. जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा निर्णय लवकरच जाहीर करू.’’ त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत कॅप्टन विनीत मुकणे कोणती भूमिका घेतात, हेच शहरातील पुढील राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहे.
राजकीय समीकरणे
कॅप्टन मुकणे हे कोणत्या पक्षासोबत किंवा गटासोबत जातात, की स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्या या निर्णयावरच नगर परिषदेतील सत्तेचे भवितव्य अवलंबून राहू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

