मुंबई
गुरुवारचा मुहूर्त इच्छुक साधणार
वाडा, ता. १२ (बातमीदार) : वाडा नगर पंचायतीची निवडणूक २ डिसेंबरला होत असून, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज (ता. १२) तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. मुहूर्त नसल्यामुळे उमेदवारांनी कोणीही उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत, अशी माहिती इच्छुकांनी खासगीत बोलताना दिली. उद्या (ता. १३) गुरुवार असल्याने चांगला दिवस आहे. त्यामुळे अनेक जण अर्ज भरतील, असेही इच्छुकांनी सांगितले.

