मुंबई
कॉलम
जयवंत सावे यांचे निधन
बोर्डी (बातमीदार) : येथील जयवंत जनार्दन सावे (वय ८१) यांचे मंगळवारी (ता. ११) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेसात वाजता बोर्डी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बोर्डी गावातील विविध समाजातील सदस्यांनी सावे यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृषी पदवीधर असलेले सावे यांनी दापोली येथून आपल्या कार्याची सुरुवात केली. दापोली, जव्हार, कासा, पालघर भागात नोकरी करून २००२ मध्ये येथून डहाणूतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.
---

