शहर नियोजनाचा फज्जा
शहर नियोजनाचा फज्जा
नवी मुंबईत १५ हजार इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : सुनियोजित शहराचा डंका पिटणाऱ्या नवी मुंबईत शहरात १५,१९० इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. यापैकी अनेकांनी परवानगीशिवाय बांधकामे सुरू केल्याने शहर नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
देशातील सुनियोजित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील प्रत्येक विभागाला अतिक्रमणांचा विळखा आहे. मुळात शहरात कोणतेही बांधकाम करायचे असल्यास महानगरपालिकेची बांधकाम परवानगी घेणे गरजेचे असते. सीसी मिळाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंजूर नकाशाप्रमाणे आहे का, याची खातरजमा करून भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते, परंतु या नियमाची सर्रास पायमल्ली होत असून, १५ हजार १९० इमारतींना अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
-----------------------------
भोगवटा प्रमाणपत्राशिवाय बांधकाम सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेच्या स्थापनेनंतर आतापर्यंत २६ हजार ९७९ इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली गेली आहे, तर ११ हजार ९६७ इमारतधारकांनी नियमाप्रमाणे बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे.
-------------------------
प्रमाणपत्र नसलेल्या इमारती
बेलापूर - १४४, नेरूळ- ५४४, वाशी- २८४, तुर्भे- २९४, सानपाडा-१०४, कोपरखैरणे- ७६, घणसोली -१३४, ऐरोली- ७५४ एकूण-२३३४
--------------------------
भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा बाधकामधारकांनी नियमांचे उल्लघन टाळावे.
-डॉ. कैलास गायकवाड, उपायुक्त, अतिक्रमण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

