आयओटीएलची पेट्रोल वाहून नेणारी  पाईप लाईन फुटली,

आयओटीएलची पेट्रोल वाहून नेणारी पाईप लाईन फुटली,

Published on

पेट्रोलवाहिनी फुटली
उरण-खारकोपर रेल्वेसेवा चार तास बंद

उरण, ता. १२ (वार्ताहर) : धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑइल अदाणी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत जेएनपीए बंदरातून जाणारी पेट्रोलवाहिनी न्हावा-शेवा रेल्वेस्थानकाजवळ पागोटे पुलाखाली बुधवारी (ता. १२) सकाळी फुटल्याची घटना घडली. या वेळी स्थानिक व प्रशासनाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला; मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उरण-खारकोपर रेल्वेसेवा बंद केल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला.

इंडियन ऑइल अदाणी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार स्फोटाच्या घटना किंवा जेएनपीए बंदरातून धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल तसेच ज्वलनशील पदार्थ वाहून आणणाऱ्या पाइपलाइनला चोरीच्या उद्देशाने टॅप लावण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्यातच बुधवारी सकाळी जेएनपीए मार्गावर पागोटे गावाजवळील उड्डाणपुलाजवळ पेट्रोल वाहून नेणारी पाइपलाइन फुटल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्या मार्गांवरून येणारी वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गांवरून वळविली. त्यानंतर या फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून न उरण-खारकोपर रेल्वेसेवा दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. त्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना सहन करावा लागला आहे.

तडा गेल्याने गळती
इंडियन ऑइल अदाणी व्हेंचर्स लिमिटेड प्रकल्पातील अधिकारी संदीप काळे यांनी सांगितले की ‘येथील पाइपलाइनला तडा गेल्याने या वाहिनीला गळती लागली आहे, मात्र ही पेट्रोलवाहिनी तत्काळ बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.’



-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com