मुंबई
आरक्षणामुळे अनेक प्रभागात उलथापालथ
राजकीय पक्ष
उमेदवारांच्या शोधात
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत विविध प्रभागात बरीच उलथापालथ झाली. त्यानंतर आता राजकीय पक्ष प्रभाग आरक्षणानंतर तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात असल्याचे दिसत आहे. दोन-तीन वेळा एकाच प्रभागात निवडणून आलेल्या काही नगरसेवकांना बदललेल्या आरक्षणामुळे प्रभाग गमवावे लागले आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी पर्यायी प्रभाग शोधण्यास सुरूवात केली आहे; मात्र आरक्षण बदलेल्या प्रभागात आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. विविध राजकीय पक्षही तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेत आहेत. त्यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.

