बेतुरकर पाडा येथे येथे अखंड हरिनाम सप्ताह  संपन्न

बेतुरकर पाडा येथे येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

Published on

बेतुरकर पाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : शिवसेना बेतूरकपाडा विभागीय शाखा व राजमाता महिला सर्वांगीण विकास मंडळ कल्याण यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अरविंद पोटे व शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी सदन बेतूरकपाडा येथे करण्यात आले होते.
कलशपूजन विजया पोटे व अरविंद पोटे यांच्या हस्ते, गणेश पूजन जिल्हा प्रमुख अरविंद मोरे व शहरप्रमुख रवि पाटील यांच्या हस्ते, विठ्ठल रूखमाई पूजन कुंदा उगले यांच्या हस्ते, संत ज्ञानेश्वर पूजन प्रदिप डेरवणकर, संत तुकाराम महाराज पूजन प्रविण लेले यांच्या हस्ते, भगवा ध्वज पूजन ज्ञानेश्वर तांबे व योगेश पोखरकर, वीणा पूजन सुनील भालेराव, परिसरातील हरिपाठ मंडळ व भजन मंडळ आणि संयोजक समिती गणेश पोखरकर, प्रदीप डेरवणकर, कुंदा उगले यांनी सहकार्य केले.
यावेळी अक्षय भोसले, विजय तनपुरे यांचे कीर्तन आणि शेवटच्या दिवशी एकनाथ सदगीर यांचे काल्याचे कीर्तन ठेवले होते. गायक दास शर्मा यांचा माता कि चौकी कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. परिसरातील असंख्य वारकरी मंडळ, भजन मंडळ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com