स्त्री सक्षमीकरणासाठी भारत परिक्रमा

स्त्री सक्षमीकरणासाठी भारत परिक्रमा

Published on

स्त्री सक्षमीकरणासाठी भारत परिक्रमा
दोन अवलिया महिलांचा १७ हजार किमी अदम्य प्रवास पार
ठाणे, ता. ७ (बातमीदार) ः हिमालयाच्या बर्फाच्छादित खिंडींपासून ते कन्याकुमारीच्या निळ्या समुद्रापर्यंत, नागालँडच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांपासून ते राजस्थानच्या तापत्या वाळवंटापर्यंत... ‘भारत के रंग, नारी के संग’ या मोहिमेने आजवर १७ हजार किलोमीटरचा थरारक, साहसी आणि प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. देशभर भ्रमंती करत महिलांच्या आरोग्य-जागरूकता, स्वच्छता, मासिक पाळी, स्तन कर्करोग आणि शिवीगाळमुक्तीच्या संदेशाचा प्रसार करण्याचा वसा घेत डॉ. अंशुजा किम्मतकर आणि लक्ष्मी म्हात्रे या दोन महिला संपूर्ण देश पालथा घालत आहेत. फक्त आर्थिक नाही, तर वैचारिक स्वातंत्र्य ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन अवलिया महिला ठाण्यात दाखल झाल्यानंतर आता पुढे गुजरातच्या दिशेने निघाल्या आहेत.
डॉ. अंशुजा किम्मतकर या किम्मतकर रुग्णालयाच्या संस्थापक असून, आरोग्य, समाजसेवा व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत, तर लक्ष्मी म्हात्रे आदर्श स्पोर्ट्सच्या संस्थापिका असून, महिलांच्या रोजगार व सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. या मोहिमेचा उद्देश महिलांच्या स्वावलंबनास प्रोत्साहन देणे, आरोग्य, स्वच्छता, मासिक पाळी व स्तन कर्करोगाविषयी जनजागृती करणे आहे.

कठीण रस्ते, जंगल, वाळवंटे आणि समुद्र पार
- ही परिक्रमा महाराष्ट्र, बिहार, नागालँड, मणिपूर, केरळ, गुजरात अशा विविध प्रदेशांतून मार्गस्थ होणार असून, याचा समारोप नागपूर येथे होईल. प्रवासादरम्यान त्यांनी हिमालयातील कठीण रस्ते, जंगल, वाळवंटे आणि समुद्र पार केले. साहस, धैर्य आणि भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचे प्रतीक असलेली ही कार राईड महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रेरणा देणारी ठरली आहे. महिलांना स्वतःचे निर्णय घेता यावे यासाठी फक्त आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, त्यांना वैचारिक स्वातंत्र्यदेखील आवश्यक असल्याचे अंशुजा यांनी सांगितले.
- या प्रवासात मिलेक्टरी आणि स्थानिक नागरिक यांचा मोठा पाठिंबा मिळाला. या भारत कार परिक्रमेस लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळेल, अशी आशा व्यक्त करत प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे, असे लक्ष्मी म्हात्रे यांनी नमूद केले.

नागपूर (रामटेक)पासून प्रवास :
मध्य प्रदेश, हरियाना, काश्मीर, लेह, कारगिल : हिमालय आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये साहसपूर्ण अनुभव.
गोरखपूर, कुशीनगर, मिथिमोड (बिहार), जनकपूर : धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची ठिकाणे.
दार्जिलिंग, गंगटोक, नरुला पास (चीन सीमा जवळ) : हिमालयातील निसर्ग आणि पर्वतीय प्रदेश.
अलीधपूर, इटानगर (अरुणाचल प्रदेश), सिलुक, खोन्सा, नागालँड (लॉन्गवा), मोन, कोहिमा : पूर्वोत्तर भारतातील निसर्ग आणि स्थानिक संस्कृती अनुभव.
मणिपूर (इम्फाल), खायबुल लिंजो, मिजोराम (आझवाल), त्रिपुरा (उंकोटी), अगरतला (बांगलादेश सीमा जवळ), शिलॉन्ग, चेरापुरी, काझीरंगा, गुवाहाटी, सिलीगुडि, जालिगुडि : विविध राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव, सांस्कृतिक स्थळे आणि पर्वतीय अनुभव.
विशाखापट्टणम, राजमुंद्री, पुडुचेरी, मदुराई, रामेश्वरम, कॅन्याकुमारी, इस्रो, कोची, मंगळूर, हम्पी, रत्नागिरी, मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, नागपूर : दक्षिण भारतातील किनारे, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, अंतराळ संस्था, पर्यटनस्थळे, निसर्ग आणि महानगर अनुभव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com