महिलांना उद्योजकता प्रशिक्षणाची संधी

महिलांना उद्योजकता प्रशिक्षणाची संधी

Published on

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : शहरातील आर्थिकदृष्ट्या गरजू, उद्योजकतेची इच्छा असलेल्या आणि प्रगतिशील महिलांसाठी विविध सानुकूलित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम भिवंडी महापालिकेमार्फत सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी भिवंडी महापालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात कौशल्य विकास, लघुउद्योजकता प्रोत्साहन, डिजिटल सक्षमीकरण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या उद्देशांनी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार बुधवारी (ता. ३) महापालिका मुख्यालयात झाला.
करारावर पालिका आयुक्त अनमोल सागर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमांतर्गत महिला कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार असून, विशेष गटांतील महिलांना आत्मनिर्भरतेसाठी मोठी संधी मिळणार आहे. वंचित आणि अल्पसंख्याक महिलांपासून ते पुनर्वसनासाठी वेशागमन महिलांना, शिक्षण सोडलेल्या आणि नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणींना या प्रशिक्षणातून व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला २१ वर्षे व त्यावरील ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उपायुक्त विक्रम दराडे, महिला व बाल विकास विभागप्रमुख मिलिंद पळसुले; तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागप्रमुख (समन्वयक) प्रदीप इंगळे उपस्थित होते. महिलांना या प्रशिक्षणाची माहिती सुलभपणे मिळावी, म्हणून महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर माहिती व मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांना येथे मार्गदर्शनासह अर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त अनमोल सागर यांनी दिली.

मिळणारे प्रशिक्षण
* फॅशन व ज्वेलरी डिझाईन
* ब्यूटीक, ब्युटी आणि वेलनेस सेवा
* फूड प्रोसेसिंग व पाककला संबंधित उत्पादने
* हस्तनिर्मित साबण, मेणबत्ती, नॅपकिन, बुके व अरोमा उत्पादने
* पॉवरलूम उद्योग आधारित कौशल्य विकास
* लॉजिस्टिक ऑपरेशन्स आणि डेटा एन्ट्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com