ठाण्यात रॅपिडो बाईककडून प्रवाशांची लूट
ठाण्यात रॅपिडो बाइककडून प्रवाशांची लूट
अनधिकृत प्रवासी वाहतूक करून आकारला जातो मनमानी दर
ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) ः ठाणे शहरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू असून, जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. शासन आणि परिवहन विभागाचा प्रवासी वाहतूक परवाना नसतानाही शहरात बिनधास्तपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. प्रवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत हे बाईकर्स रिक्षाच्या भाड्यापेक्षा दुप्पट, तिप्पट भाडे आकारत आहेत. प्रवाशाला वाहून नेताना त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.
शहरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. अशावेळी काहींना कामावर जाण्यासाठी रिक्षा, बस वेळववर मिळत नाहीत, तर अशावेळी बसमध्येही मोठी गर्दी असते. अशात गरजू प्रवाशांना कामावर लवकर पोहोचवण्यासाठी ठाण्यात बाइक टॅक्सीचा वापर केला जात आहे. रॅपिडो नावाच्या ॲपच्या माध्यमातून हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. प्रवाशाने ॲपवरून मागणी केल्यास अवघ्या दोन-तीन मिनिटात बाइक त्याच्यासमोर उभी राहून तो इच्छितस्थळी घेऊन जातो, मात्र त्या प्रवाशाला त्यासाठी जादा भाडे द्यावे अदा करावे लागते. शिवाय या अनधिकृत वाहतुकीमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांनादेखील आर्थिक नुकसान होत आहे.
मनमानी भाडे
प्रवाशाने ॲपवरून इच्छितस्थळी जाण्यासाठी रॅपिडो बाइकची मागणी करताच त्याची गरज ओळखून मनमानी भाडे सांगितले जाते. वाहतूक कोंडी, कामाची वेळ आदी बाबी विचारात घेऊन दर घेतला जातो.
शेअरिंग रिक्षापेक्षा तिप्पट, चौपट दर
ठाण्यात शेअरिंग रिक्षाची सुविधा आहे. या रिक्षाच्या भाड्याच्या तिप्पट भाडे हे बाइकवाले घेतात. त्यामुळे ठाण्यात त्यांचा सुळसुळाट झाला आहे.
पुण्यात दणका
पुण्यात प्रादेशिक परिवहनचे (आरटीओ) नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली रॅपिडो बाइक वाहतूक तेथील रिक्षा, टॅक्सी चालकांनी कडाडून विरोध करून बंद पाडली आहे. ठाण्यात मात्र ती बिनधास्तपणे सुरू आहे.
भाडे बाइक रिक्षा
ठाणे रेल्वेस्थानक ते कासारवडवली - (रात्री ८: ४८वा)- १३१ ५०
कासारवडवली ते ठाणे रेल्वेस्थानक (सकाळी १०:०७) - १३५ ५०
ठाणे रेल्वेस्थानक ते कापूरबावडी - ७३ ३०
स्थानक ते अशार आय टी पार्क - १३१, २५
स्थानक ते लोकमान्य नगर - १३०, २५
रिक्षाचालकाकडून प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. अनधिकृत ॲपवरून बाइक बुक करून होणारी वाहतूक मात्र धोकादायक आहे. अशा वाहतुकीवर बंदी आणावी, अशी मागणी परिवहनमंत्री आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे वारंवार करण्यात आली आहे.
- दयानंद गायकवाड, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती रिक्षा टॅक्सी युनियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

