बदलापुरात राजकीय संघर्ष टोकाला; शिवसेना नगरसेवक मारहाण प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा!

बदलापुरात राजकीय संघर्ष टोकाला; शिवसेना नगरसेवक मारहाण प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा!

Published on

मारहाणप्रकरणी दोन्ही बाजूंनी ॲट्रॉसिटी
बदलापुरात राजकीय संघर्ष टोकाला
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) ः सोनिवली परिसरात शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यात भाजप पदाधिकारी तेजस ऊर्फ बंटी म्हसकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दर्शनादरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाला प्रतिउत्तर म्हणून भाजपकडूनही कारवाई करण्यात आली आहे. बंटी म्हसकर यांच्यासोबत असलेले भाजपचे आदिवासी सहकाऱ्यांनी शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे यांच्या सहकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत परस्पर गुन्हे दाखल झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. संबंधित सर्व आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com