वेगाच्या नादात जीव धोक्यात
वेगाच्या नादात जीव धोक्यात
मोखाड्यात दुचाकी चालकाचा भीषण अपघात
मोखाडा, ता.२९ (बातमीदार)ः मोखाड्यातील दुचाकी अपघातात तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून वेगाच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वांरवार घडत असल्याने कारवाईची मागणी होत आहे.
मोखाड्यात सायलेन्सरचा आवाज मोठा करत दुचाकी चालवण्याचा नाद तरुणांमध्ये फोफावली आहे. दिवसागणिक मोखाड्यात असे छोटे, मोठे अपघात वारंवार होत आहे. जोगलवाडी येथील वैभव कडुचा (२२) नाशिकमधील विल्होळी येथे कामासाठी जाताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने रात्री ८ च्या दरम्यान वाकडपाडा गावाजवळ अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. त्याच्या पायाचे हाड ही मोडले आहे. त्यामुळे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
-------------------------------
कारवाईची मागणी
मुख्य बाजारपेठा तसेच हमरस्त्यावर कर्कश हॉर्न, सायलेन्सरचा मोठा आवाज करत दुचाकी चालवण्याचा नवा ट्रेंड सध्या मोखाड्यात फोफावला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून बहुतांश दुचाकीस्वारांकडे वाहन चालवण्याचे परवाने देखील नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मोखाडा पोलिसांनी नाकाबंदी करन कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

