धुरक्याने आरोग्याच्या तक्रारी
धुरक्याने आरोग्याच्या तक्रारी
वसई-विरार शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली
वसई, ता.१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात धूलिकणांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. वाहनांची वर्दळ, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, त्यासाठी होणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीमुळे हवेतील धुरक्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागले आहेत.
वसई-विरारमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १६० ते १७५ दरम्यान आहे. एकीकडे महापालिका क्षेत्रात सुरू असलेले खोदकाम, वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत धूलिकण पसरू लागले आहेत. तर दुसरीकडे वातावरणातील सततच्या बदलांमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. दूषित वातावरणामुळे सकाळी, सायंकाळी फेरफटका मारणारे नागरिक, वाहनचालकांना धुरक्यातून वाट काढावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणावर नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे यांत्रिकी झाडूचा वापर सार्वजनिक ठिकाणी केला जात आहे. परंतु प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
---------
शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूलिकणांचे प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम वसईकरांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
- डॉ. सुनील रणाईत, वसई
-----------
हवेची गुणवत्ता निर्देशांक
नायगाव, नवघर, रानगाव १५० ते १७५
नालासोपारा १२० ते १३४
विरार १०९ ते १७५
--------
वसई : सनसिटी-चुळणे मार्गावर धुरकट वातावरण तयार झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

