सोसायटीचा मेंटेनन्स मागितला म्हणून कुटुंबाला काठीने मारहाण

सोसायटीचा मेंटेनन्स मागितला म्हणून कुटुंबाला काठीने मारहाण

Published on

देखभाल, दुरुस्तीचा खर्च मागितल्याने कुटुंबाला मारहाण
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : पूर्व भागातील माणेरे गावातील केबिके नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोसायटीचा मेंटेनन्स मागितल्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबावर काठीने हल्ला चढवण्यात आला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

केबिके नगरमधील एका सोसायटीमध्ये मेंटेनन्सच्या पैशांवरून रहिवाशांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटण्याऐवजी इतका विकोपाला गेला की, काही जणांनी थेट हातात काठ्या घेऊन एका कुटुंबावर हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक घरातील सदस्यांना क्रूरपणे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. या हल्ल्यात कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले असून, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सोसायटीमधील अंतर्गत वाद सामोपचाराने सोडवण्याऐवजी अशा प्रकारे हिंसक वळण लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून एखाद्या कुटुंबाला अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याने कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com