६० महिलांची २० वर्षांपासून उपेक्षा
६० महिलांची २० वर्षांपासून उपेक्षा
जव्हारमधील आश्रमशाळांमध्ये अल्पमानधनावर काम
जव्हार, ता. ९ (बातमीदार)ः परिसरातील आश्रमशाळांमध्ये २० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या ६० महिलांनी सोमवारी सकाळी प्रकल्प कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. या वेळी माझी २० वर्षे मला परत द्या, लाडक्या बहिणीचे पैसे परत घ्या, पण आम्हाला आमचा रोजगार द्या!, अशा संतप्त घोषणा देत भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले.
आदिवासी विकास विभागाने ६० महिलांना कामावरून काढून टाकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्र मैदानात उतरली असून, प्रशासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारले आहे. या वेळी दोन दशकांपासून जव्हारच्या मातीत कष्टाची शिदोरी बांधत सेवा करणाऱ्या महिलांना एका झटक्यात कामावरून काढून टाकण्याचा निर्णय अन्यायकारकच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.
---------------------------
घोषणांमधून रोष
जव्हार प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी पीडित महिलांचा आक्रोश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, तर राज्य सरचिटणीस नवनाथ भोये, स्वप्नील वाघ उपस्थित होते. या वेळी ‘लढा आमच्या हक्कांचा, स्वाभिमानी भूमिपुत्रांचा’, अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

