रायगडच्या अभिषेक खातू व कौस्तुभ म्हात्रे यांची सुपर लीगसाठी निवड

रायगडच्या अभिषेक खातू व कौस्तुभ म्हात्रे यांची सुपर लीगसाठी निवड

Published on

रायगडच्या अभिषेक खातू व कौस्तुभ म्हात्रे यांची सुपर लीगसाठी निवड
वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
पोयनाड, ता. १२ (बातमीदार) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघातील दोन युवा जलदगती गोलंदाज अभिषेक खातू आणि कौस्तुभ म्हात्रे यांची आगामी सुपर लीग सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत अभिषेक खातू यांची निवड सेक्रेटरी ११ संघात, तर कौस्तुभ म्हात्रे यांची अध्यक्षीय ११ संघात करण्यात आली आहे. साखळी फेरीतील पाच सामन्यांत अभिषेक खातू यांनी एकूण १८ गडी बाद करत प्रभावी गोलंदाजी केली. त्यामध्ये एका डावात तब्बल आठ फलंदाज बाद करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. फलंदाजीतही त्यांनी १६१ धावा करत दोन अर्धशतके झळकावली.
दुसरीकडे, कौस्तुभ म्हात्रे यांनी रायगड संघाकडून खेळताना साखळी फेरीतील सामन्यांत २२ फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्यांची सुपर लीग सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेटप्रेमींनी दोन्ही खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com