जळगाव जिल्ह्यात नव्या नेतृत्त्वाची नांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात नव्या नेतृत्त्वाची नांदी
जळगाव जिल्ह्यात नव्या नेतृत्त्वाची नांदी

जळगाव जिल्ह्यात नव्या नेतृत्त्वाची नांदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : राज्यात सरकार स्थापन झाले, आता मंत्रिमंडळात स्थान कोणाकोणाला? याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून कोणाची वर्णी लागेल याची चर्चा सर्वाधिक आहे. उत्तर महाराष्ट्रतून तरुण आणि उमदा चेहरा म्हणून पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यांचे शिंदेंकडे असलेले गुडविल अन् समन्वय साधण्याची किमया, नवीन चेहरा, सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. जळगाव जिल्ह्यातील नव्या नेतृत्त्वाची ही नांदी ठरू शकते. भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांसह किशोर पाटील यांच्या रूपाने नेतृत्त्वाचा नवा चेहरा जिल्ह्याला लाभू शकतो.
संभाव्य मंत्रिमंडळाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्राचा (नगर सोडून) विचार केला तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांचे नाव पुढे येते. त्यांच्याबरोबर पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे किशोर पाटील यांचेही नाव नवीन चेहरा म्हणून सध्या आघाडीवर आहे.

किशोर पाटील यांचे नाव रेसमध्ये
आमदार किशोर पाटील यांचे संभाव्य मंत्रिमंडळात नाव आघाडीवर असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. डॅशिंग स्वभाव आणि लोकांचे प्रश्न तात्काळ जागेवर सोडवण्याची तत्परता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषणातून आता थांबायचे काम नाही. तात्काळ कामे मार्गी लावण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेले काम आमदार किशोर पाटील करत असल्याने त्यांचे पारडे जड आहे.

चौकट
राजपूत समाजाचा चेहरा
राज्यात १०-१२ टक्के राजपूत समाज आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाकडे किशोर पाटलांच्या रूपाने एकमेव राजपूत समाजाचे आमदार आहेत. त्यामुळे राजपूत समाजाकडूनही किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्याची मागणी जोर धरत आहे. त्यांना मंत्रिपद दिल्यास राज्यातील राजपूत समाजाचा विचार नव्या सरकारने केला असा संदेश जाईल. पर्यायाने हा समाज शिंदे गटाकडे आकृष्ट होईल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Nsk22f70991 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..