
गीतांच्या मैफलीने तरुणाईत उत्साह
पुणे, ता. ११ ः ‘यिन समर यूथ समिट २०२२’ मध्ये गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका योगिता गोडबोले यांच्या गीतांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ९ आणि १० मे रोजी ‘यिन समर यूथ समिट २०२२’ झाली. त्यातील मंगळवारच्या सत्रात दिवसभर ज्ञानार्जन केल्यानंतर सुरेल गीतांच्या मैफलीने तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला. गायक मंगेश बोरगावकर व गायिका योगिता गोडबोले यांनी गीते सादर करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गीतावर टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. ‘अलबेला सजन आयो रे’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी’, ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’, ‘झिंगाट आणि चंद्रा’ अशी गीते त्यांनी सादर केली. त्यामुळे स्वरसाजने उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. सुरेल स्वरांची जादुई कायम असते याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. ढोलकीवर तबल्याच्या ठेक्यावर त्यांनी नृत्याचा ताल धरला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62540 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..