नाशिक आयटीआय राज्यात उत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक आयटीआय राज्यात उत्कृष्ट
नाशिक आयटीआय राज्यात उत्कृष्ट

नाशिक आयटीआय राज्यात उत्कृष्ट

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे २०२०-२१चा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार’ नाशिक जिल्ह्यातील शासकीय आयटीआय (मुलींची) जाहीर झाला आहे. तर पुणे विभागीय स्तरावरील पुरस्कार कोल्हापूरमधील स्मॅक संचलित स्व. जवानमलजी गांधी खासगी आयटीआयला जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विविध कामासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार’ देण्यात येतो. या अंतर्गत पहिल्या क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक विभागातील शासकीय आयटीआयला (मुलींची) घोषित केला आहे. तर लालजी मेहरोत्रा खासगी आयटीआय, जोगेश्वरी (मुंबई विभाग), वर्ध्यातील शासकीय आयटीआय, पुलगाव (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शासन निर्णयातील गुणांकनानुसार संबंधित आयटीआयची निवड पुरस्कारासाठी केली जाते. विभागस्तरीय पुरस्कार विभाग : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव नागपूर विभाग : अंबुजा अशासकीय आयटीआय (जिल्हा : चंद्रपूर) औरंगाबाद विभाग : शासकीय आयटीआय (जिल्हा : जालना) पुणे विभाग : स्मॅक संचलित स्व. जवानमलजी गांधी खासगी आयटीआय (जिल्हा :कोल्हापूर) नाशिक विभाग : लोकपंचायत रूरल टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे खासगी आयटीआय, संगमनेर (जिल्हा : नगर) मुंबई विभाग : शासकीय आयटीआय, ठाणे अमरावती : शासकीय आयटीआय, अमरावती

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86700 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..