वाढवण बंदरामुळे गुजरात बंदराचे महत्त्व संपेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण बंदरामुळे गुजरात बंदराचे महत्त्व संपेल
वाढवण बंदरामुळे गुजरात बंदराचे महत्त्व संपेल

वाढवण बंदरामुळे गुजरात बंदराचे महत्त्व संपेल

sakal_logo
By

नागपूर, ता. २२ ः केंद्र सरकारने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे देशातील सर्वांत मोठे बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र, स्थानिक मच्छीमार याला विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे मासेमारी संपुष्टात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विषयावर आमदार कपिल पाटील, सचिन अहिर, सुनील शिंदे, विलास पोतनीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना वाढवण बंदर तयार झाल्यास गुजरात बंदराचे महत्व संपेल असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मेजर पोर्ट प्रकल्प शासनाच्या आधिपत्याखाली असतात. या प्रकल्पाचा प्रस्ताव २०२० मध्ये केंद्राने तयार केला होता. ६५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारीत २०२० ला तत्त्वतः मान्यता दिली. जवाहरलाल नेहरू प्राधिकरण यांना या प्रकल्पाला अंमलबजावणी करण्याची यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने वाढवण हद्दीबाबतच्या अधिसूचना फेब्रुवारी २०२० ला निर्गमित केली आहे, असे देवेंद्र फडणवीस सांगितले.

वाढवण बंदराची जागा देशात सर्वोत्तम आहे. वाढवण भागातील समुद्रात २० मिटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून या ठिकाणी मोठ्या आकाराचे जहाज सहजपणे येऊ शकते. वाढवण बंदर झाल्यानंतर येथे अत्याधुनिक फिशिंग मार्बल देण्याचा प्रयत्न असेल. नुकसानभरपाई, फिशिंग हार्बर आदी योजना आणून आधुनिक बोटी आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे, असे फडणवीस म्हणाले. स्थानिकांशी चर्चा करूनच हा प्रकल्प राबवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या पोर्टमुळे गुजरात पोर्टचे महत्त्व संपणार आहे. देशभरात याच पोर्टला महत्त्व येईल. सरकार मच्छिमारांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडून त्यांचे पुनर्वसन करणार असल्याचीही ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी या वेळी दिली.