आषाढी वारीत होणार वारकऱ्यांची नेत्रतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारीत होणार वारकऱ्यांची नेत्रतपासणी
आषाढी वारीत होणार वारकऱ्यांची नेत्रतपासणी

आषाढी वारीत होणार वारकऱ्यांची नेत्रतपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर सासवड ते वाखरी दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सामाजिक जाणिवेतून ‘आरोग्य वारी’ प्रकल्पांतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ सोशल फाउंडेशन, श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, तरडगाव, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव व वाखरी येथे वारकऱ्यांची मोफत नेत्रतपासणी करून प्रत्येक ठिकाणी ३०० मोफत चष्मे वाटप करणार आहेत.

पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ११ ठिकाणी चुकलेल्या वारकऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने दिंडीपर्यंत सुखरूप पोचविण्यासाठी स्थानिक महाविद्यालय व शाळेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम सकाळ सोशल फाउंडेशन व श्री मुकुंद भवन ट्रस्ट राबविणार आहे. आषाढी वारीत दरवर्षी या उपक्रमाचे सकाळ सोशल फाउंडेशनकडून इतर संस्थांच्या सहकार्याने आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शेकडो वारकऱ्यांना फायदा होतो. या उपक्रमास सर्व ठिकाणी स्थानिक पोलिस प्रशासनाचेही सहकार्य मिळते. वारकऱ्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80639 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top