राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणे
राणे

राणे

sakal_logo
By

त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही ः राणे केंद्रीयमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून टीका केली. राणे म्हणाले की, ‘‘ पवार या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.’’ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. ‘‘ राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिले? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा ’’ असा टोला त्यांनी लगावला आहे. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असेही राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83201 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top