कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
पुणे, ता. १८ : एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते. दरम्यान, हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग २० व २१ सप्टेंबर रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडिंगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. हे प्रशिक्षण समाजसेवी संस्था, फाउंडेशन्स, सीएसआर क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे अधिकारी तसेच विद्यार्थी यांना उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७
‘महारेरा’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी ‘महारेरा’ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १२ सप्टेंबर रोजी चालू झाले आहे. १० नोव्हेंबर रोजी हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोर्टल बंद होण्यापूर्वीचे पुढील प्रशिक्षण २२ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. २०२५ या वर्षानंतर पोर्टल चालू होण्याची शक्यता नसल्याने प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबर २०२५मध्ये होणाऱ्या परीक्षेस सामोरे जाण्याची ही या वर्षातील शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
४० प्रकारचे चहा व व्यवसाय संधी
कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण २७ व २८ सप्टेंबर रोजी आयोजिले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील. तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा, चहाची विक्री कशी वाढवायची याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहाविक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७
बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर तीस दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.