वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई

वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By

रसायनी, ता. ५ (बातमीदार) : वासांबे-मोहोपाडालगतच्या गावांत वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या पथकाने कारवाई केली आहे. कंपनीने तिघांकडून ९६ हजार ७९८ रुपये वसूल केले आहेत. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील रिस येथील दोन जण चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले. त्‍यांच्याकडून अनुक्रमे १४ हजार २१६ रुपये व ४० हजार ९६ रुपये वसूल करण्यात आले. चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कांबे येथेही एक जण वीज चोरून वापरत असल्याने त्याच्याकडून ४२ हजार ४८६ रुपये रक्कम वसूल केली आहे. ग्राहकांनी वीज मीटरचा वापर करावा, वीजचोरी करू नये; अन्यथा कारवाई केली जाईल. तसेच थकीत वीजबिल लवकरात लवकर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे सहायक अभियंता किशोर पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02518 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top