मीनेश गाडगीळ यांना कृ्षिभूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीनेश गाडगीळ यांना कृ्षिभूषण पुरस्कार
मीनेश गाडगीळ यांना कृ्षिभूषण पुरस्कार

मीनेश गाडगीळ यांना कृ्षिभूषण पुरस्कार

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे शेतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना, कार्य यासाठी राज्य सरकारकडून विविध पुरस्कार प्रदान समारंभ घेण्यात आला. या समारंभात रसायनीतील गुळसुंदे येथील शेती संशोधक मीनेश मोहन गाडगीळ यांना २०१९ कृषिभूषण सेंद्रिय शेती या पुरस्काराने सपत्निक गौरविण्यात आले. हा पुरस्कार हा राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, नरहरी झिरवळ उपस्थित होते. सेंद्रिय प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर व कंपोस्ट इनहॅन्सर यांचे संशोधन आणि सेंद्रिय शेतीमधील त्याचा पसार या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मीनेश गाडगीळ यांना कृषिभूषण देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02519 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top