
वासांबे मोहोपाडा बाजारपेठेत करवंद दाखल
ारसायनी, ता. ११ (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा बाजारपेठेत डोंगरचा रानमेवा म्हणून ओळखली जाणारी, रसाळ, आंबट-गोड डोंगराची काळी मैना करंवद विक्रीसाठी येऊ लागली आहेत. या करंवदांना नागरिकांकडून चांगली मागणी असून १० रुपये वाट्याने त्याची विक्री होत आहे. या विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याने आदिवासी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. थोड्या दिवसांनी करंवदांची आवक वाढणार असून जांभळेही विक्रीला येतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
रसायनीलगतच्या कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगातील घेरामणिक गडाच्या डोंगररांगात अनेक आदिवासीवाड्या आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवांना खास उपजीविकेचे साधन नाही. या बांधवांना आणि खेड्यातील काही शेतकरी उन्हाळ्यात जांभूळ, करवंद, आंबे, काजू आदी रानमेवा विकून चार पैसे मिळवत असतात. त्याचा त्यांना दैनंदिन खर्चाला चांगला आधार होत आहे. शेतकरी करंवदांच्या झाडाच्या फांद्या शेतीला कुंपण घालण्यासाठी, काही जण जाळण्यासाठी उपयोग करत आहेत. त्यामुळे या झाडांची संख्या घटली आहे. पूर्वी ओढ्याला, छोट्या टेकडीच्या परिसरात मिळणारे करंवदे आता मिळत नाही. त्यामुळे तो दुर्मीळ होत आहे. ही करंवदे शोधण्यासाठी जंगलात जावे लागते. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी रानमेव्याचे पीक कमी आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहासाठी जंगलात रानमेवा जमा करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या मोहोपाडा बाजारपेठेत करवंद, आंबे विक्रीसाठी येऊ लागले आहे. करवंदांचा वाटा १० रुपयांना असल्याचे आदिवासी विक्रेत्या महिलेने सांगितले.
--------------
झाडांची संख्या घटू लागली आहे. त्यात हवामान बदलाच्या परिणामामुळे करंवदाचे पीक कमी होऊ लागले आहे. तर जांभळांच्या बहुतेक झाडांना या वर्षी उशीर मोहोर आला. मात्र, १२ ते १५ दिवसांत ते सुद्धा बाजारात विक्रीला येतील.
- सुदाम कडपे, कृषीमित्र, वासांबे मोहोपाडा
---------------
बाजारात आलेले काळीभोर, रसाळ आणि आंबट-गोड, जांभूळ, करंवदे हवीहवीशी वाटतात. मधुमेहग्रस्तांनी जांभळे खाणे गुणकारी असते. महाग असले, तरी दरवर्षी ते खरेदी करत आहे.
- सुजाता पाटील, ग्राहक, वासांबे मोहोपाडा
Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02536 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..