
जिल्हा कारागृहातील कैद्यांना संगीत साहित्यवाटप
रसायनी, ता. २६ (बातमीदार) : शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने राज्यातील कारागृहांत कैद्यांसाठी अभंग आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कैद्यांना सराव करण्यासाठी संगीत साहित्यासह पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कैद्यांना सराव करताना संगीत साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी अलिबाग, रायगड कारागृह अधीक्षक नागेश सावंत आणि तुरुंग अधिकारी रणनवरे यांच्याकडे प्रतिष्ठान आणि कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या सौजन्याने हातपेटी (हार्मोनियम), पखवाज, तबला जोड, इग्गा, १० जोड टाळ, हातोडी आणि विविध लेखकांची ८२ पुस्तके असे साहित्य सुपूर्द करण्यात आले. या वेळी स्पर्धेचे रायगड जिल्हा आणि कल्याण विभाग प्रमुख वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे आणि प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव राकेश खराडे उपस्थित होते. हे सर्व साहित्य कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक सदाफुले, तुरंग अधिकारी काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक जे. टी. पवार यांच्याकडे शुक्रवारी (ता. २७) संगीत साहित्य सुपूर्द करण्यात येणार आहे. मुंढे आणि खराडे यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय संगीत स्पर्धेसाठी तळोजे, कल्याण आणि अलिबाग कारागृहातील प्रमुखांसोबत चर्चा केली असून संगीत शिक्षकांकडून सराव सुरू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02563 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..