प्रगती जांभुळकर उपसरपंचपदी बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रगती जांभुळकर उपसरपंचपदी बिनविरोध
प्रगती जांभुळकर उपसरपंचपदी बिनविरोध

प्रगती जांभुळकर उपसरपंचपदी बिनविरोध

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : रसायनीतील सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या प्रगती जांभुळकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदाचा कांता कांबळे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. प्रगती जांभुळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंच सचिन म्हसकर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी ग्रामविकास अधिकारी सतीश देवकाते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. जांभुळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, सरपंच सचिन म्हस्कर, सदस्य प्रशांत माळी, सुनील माळी आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02623 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..