विद्यार्थ्यांना धैम्य ऋषींची माहिती कथन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना धैम्य ऋषींची माहिती कथन
विद्यार्थ्यांना धैम्य ऋषींची माहिती कथन

विद्यार्थ्यांना धैम्य ऋषींची माहिती कथन

sakal_logo
By

रसायनी, ता. १४ (बातमीदार) : रसायनीतील महिला उद्योग मंडळाच्या शिशू विकास आणि प्राथमिक शाळेत बुधवारी (ता. १३) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव पाटील, शिशू विकास बालमंदिर शाळा मुख्याध्यापिका सुप्रिया गायकर, मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण गायकवाड उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन केले. त्यानंतर सातवी, आठवीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन स्वागत गीत सादर केले. शिक्षिका ललिता गुडसे यांनी धैम्य ऋषी आणि अरुणि यांची गोष्ट सांगून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. कार्याध्यक्ष अरुण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांची कथा कथन केली.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02663 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..