पावसाचे पाणी तुंबत असल्याने नागरिकांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचे पाणी तुंबत असल्याने नागरिकांचे हाल
पावसाचे पाणी तुंबत असल्याने नागरिकांचे हाल

पावसाचे पाणी तुंबत असल्याने नागरिकांचे हाल

sakal_logo
By

रस्‍ता पाण्याखाली गेल्‍याने नागरिकांचे हाल
रसायनी, ता. १८ (बातमीदार) ः रसायनी परिसरातील वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायती क्षेत्रातील दांड-पेण मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्‍याने नागरिकांचे हाल होत आहेत. सेबी फाट्याजवळ पाणी निचऱ्यासाठी योग्‍य नियोजन न केल्‍याने थोडा जरी पाऊस पडला तरी रस्‍त्‍यावर पाणी साचते. एखादे वाहन वेगाने गेल्‍यास पादचाऱ्यांवर चिखलयुक्‍त पाण्याचे फवारे उडत असल्‍याने संताप व्यक्‍त होत. एमआयडीसीतील कामगारांना याच मार्गावरून जावे लागते.
मुख्य रस्त्यालगत सांडपाणी आणि नैसर्गिक पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या गटाराच्या मोऱ्या अनेक ठिकाणी तुंबल्‍या आहेत. त्‍यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्‍याने ते रस्‍त्‍यावर साचते. परिणामी स्‍थानिकांची गैरसोय होते. याच रस्त्यावरून पाताळगंगा, अतिरिक्त पाताळगंगा तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील गावांकडे जाणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते.
रसायनी ः रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02789 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..