रसायनीत शुक्रवारी पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनीत शुक्रवारी पाणी बंद
रसायनीत शुक्रवारी पाणी बंद

रसायनीत शुक्रवारी पाणी बंद

sakal_logo
By

रसायनी, ता. २२ (बातमीदार)ः रसायनीतील वासांबे-मोहोपाडा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनीतील गळती दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नऊ तास बंद राहणार आहे. परिणामी कारखानदार आणि नागरिकांनी पाण्याचा साठा करून नियोजन करावे, असे एमआयडीसीच्या जल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या केंद्रातून रसायनीतील इसरो लिमिटेड, हिल इंडिया लिमिटेड, लोना इंडस्ट्रीज लिमिटेड आदी कारखाने, तसेच वासांबे-मोहोपाडा, चांभार्ली, वावेघर, सावळे, पोसरी, तुराडे, बारवाई, पोयंजे, भिंगार, कोन, पळस्पे, कसळखंड आदी ग्रामपंचायती क्षेत्रातील ३५ गावांना, तसेच पनवेल महापालिकेला काही प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02797 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..