मोहोपाड्यातील नवरात्रोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहोपाड्यातील नवरात्रोत्सव उत्साहात
मोहोपाड्यातील नवरात्रोत्सव उत्साहात

मोहोपाड्यातील नवरात्रोत्सव उत्साहात

sakal_logo
By

रसायनी, ता. ४ (बातमीदार) : वासांबे मोहोपाड्यातील गणेश नगर, रिस येथील वरदविनायक गणपती मंदिर ट्रस्ट आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २२ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षीही नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. गणेश नगर रिस येथील सर्व नागरिक या उत्साहात सहभागी होत आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची नित्य पूजा, आरती होत असते. तसेच रात्री गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. दसऱ्याला शमीपूजन आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.