रसायनीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
रसायनीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

रसायनीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : रसायनीतील पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीयल मेडिकल असोसिएशन आणि एस. एच. केळकर लिमिटेड, वाशिवली यांच्या संयुक्त विद्यमाने वावेघर, आपटे, माझगाव केंद्रातील २० जिल्हा परिषद शाळांमधील ५६९ विद्यार्थ्यांना ५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. चावणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खुटलवाडी येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमाला असोशिएशनचे अध्यक्ष संजय कुरंगळे, सचिव डॉ. गजानन पाटील, उपाध्यक्ष संजय त्र्यंबके, डॉ. संगीता जैन, डॉ. युवराज म्हशेळकर, डॉ. राहुल यादव, प्रशांत जगताप, डॉ. अमित चव्हाण, वावेघर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश जोशी, आरती नाईक, शिक्षक कैलास रायकर, नागनाथ चव्हाण, अनिल घाडगे उपस्थित होते. खुटलवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुनीता खोमणे आणि प्रमोद देशमुख यांनी उत्तम नियोजन केले होते. मधुरा पवार या विद्यार्थिनीने आभार र्वांचे आभार मानले.