Tue, Feb 7, 2023

धनाजी टिळे यांची बिनविरोध निवड
धनाजी टिळे यांची बिनविरोध निवड
Published on : 18 October 2022, 12:35 pm
रसायनी, ता. १८ (बातमीदार) : बंगळुरू येथे पार पडलेल्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डिप्लोमा इंजिनीअर्सच्या २५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी बिनविरोध निवडणूक पार पडली. यामध्ये कनिष्ठ अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्याच्या तीन पदाधिकाऱ्यांना ऑल इंडिया फेडरेशन आफ डिप्लोमा इंजिनीअर्सची पदे आणि प्रतिनिधित्व देण्यात आले. यात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनाजी टिळे यांना दक्षिण मध्य सचिव महाराष्ट्र, तेलंगणा, दीव, दमण, दादरा नगरहवेली जबाबदारी दिली आहे.